Monday, 1 February 2016

अन्नपाउलखुणा



अन्नपाउलखुणा 

  मानवाच्या जवळजवळ सर्वच व्यवहारानमुळे हवामानातील उष्णता उत्तर्रोत्तर वाढत आहे. जगण्यासाठी कराव्या लागण्याऱ्या व्यवहारांमुळे कार्बनच्या पाउलखुणा आपण मागे सोडत जातो. शहरातील उच्च उत्पन्न गट कार्बनच्या सर्वाधिक  पाउलखुणा  मागे सोडतो. किंबहुना शहर चालवण्या साठी करावे लागणारे सर्वच व्यवहार कार्बन उत्सर्जित करणारे. त्या अनेक व्यव्हारांपैकी  अन्नपदारथांची वाहतूक करणारा एक मोठा घटक ठरतोय.  शहरांमधील वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्याची अन्नधान्य, शेतमाल, दूध, मांस, इत्यादी माल दूर वरून आणला जातो . अन्नसाखळीच्या  कार्बन  उत्सर्जित करण्यारा या पाऊलखुणा. अन्नापाधार्थ जितके लांबून येतील तितक्या अन्नपाउलखुणाहीं  वाढत जातील. 
कार्बनच्या पाऊलखुणा मोजण्याचे सूत्र तयार झाले आहे. विकसित देशांमध्ये एक जेवण १२०० मैल प्रवास करते. 
स्थानिक पातळीवर अन्न उत्पादन झालेले असल्यास अन्नपाउलखुणा कमी होतील. शहरे वाढतील तसे त्यांना अन्नपुरवठा करण्याचा  यक्षप्रश्न उभा राहील